Tuesday 18 August 2015

…. लेकीन

जिना सिखा नही इन यादो के बिना …. लेकीन
बह जाती है वो यादे भी ., आंसूओ के सहारे

अधुरी रह जाती ही कश्ती जिंदगी कि …. लेकीन
ख्वाब बोये जाते है ., आंखो के सहारे

कहते ही लोग " अजमाये नसीब अपना - अपना "… लेकीन
हौसले बुलंद होते ही ., तकदीर के सहारे

करता नही रहम भी वो खुदा अपने बंदो पर…. लेकीन
करनी पडती है इबादत भी ., हातो के सहारे

कटती नही जिंदगी बैठकर मेह्खानो मे… लेकीन
काटणी पडती है रह भी ., पेऱो के सहारे

इतना आसान नाही मरणा इस जहान मे … लेकीन
जाणा पडता है शमशान भी ., कंधो के सहारे


अक्षय भळगट
१९.०८.२०१५  



Tuesday 30 June 2015

पाऊसही आपल्या मित्रांसारखाच असतो !

पाऊसही आपल्या मित्रांसारखाच असतो !

नकळत येतो  .,जिवलग होतो ….
नकळत जुळते ., नाते - संबंध …
नकळत होते ., मनही बेधुंद …
असाच … नकळत आपलासा होतो …
म्हणूनच …
पाऊसही आपल्या मित्रांसारखाच असतो !

कधी हसवतो ., कधी रडवतो .,
कधी रुसतो ., कधी उमगतो .,
कधी खूप शांत ., कधी खूप बोलतो .,
कधी भिजवतो ., कधी सामावून घेतो .,
मीही असाच त्यात भरकटत जातो …
म्हणूनच ….
पाऊसही आपल्या मित्रांसारखाच असतो !

कधी गर्जतो … धडाम-धडा …।
कधी हळुवार स्पर्शती धारा ….
जेव्हा हवा-हवासा वाटतो …
तेव्हाच दूर निघून जातो ….
कधी खूपच तुटल्यासारखा भासतो …
अन मलाच प्रश्नात पडतो … !
असा का अचानक " हा " सोडून जातो … ????
त्यावर एकाच उत्तर मिळत …
पाऊसही आपल्या मित्रांसारखाच असतो !

अक्षय भळ्गट
३०.०६.२०१५  

Monday 15 June 2015

स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार
तुझ्याच आठवणींनी , त्यांना सजवलय फार

मिटता डोळे  दिसते …, तूच सगळी कडे .,
उघडता क्षणी होतो ., सर्वत्र अंधार …
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

निजता अंथरुणी … ऊब तुझीच भासते …,
घट्ट कवटाळता उशी ., झोप लागते गाढ ….
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

पाऊला - पाऊला वर होतो., भास तुझा चोहीकडे
स्पर्श करता तुज ., मन हि होते बेजार ….!
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

हलक्या - हलक्या बोलांची ,
आखीव सुंदर चारोळ्या .,
सांगड तुझ्या आठवणींशी ,
घाले कवितेच्या ओल्या .,
तुझ्या मोजक्या क्षणांशी .,
हितगुज होते फार …।
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

अक्षय भळगट
१५.०६.२०१५


Friday 12 June 2015

विचार कर माझा …!

तु म्हणत असतेस " मी " मित्र आहे तुझा ….!
पण एकदातरी … विचार करून बघ माझा … !

सगळ माहितीये तुला , तरी लय नाटक करते …!
का कोणास ठाऊक ., पण इतका भाव खाते …!
कळलाय तुझा ATTITUDE … बास झाली ना सजा …।
आता एकदा तरी स्वताहून ., विचार कर माझा …!

एकदा मनापासून -  " हो " म्हणून तर बघ ,
गवसेल तुलाही ., तुझ्या स्वप्नातलं जग …!
" हो " म्हणण्यातच बघ, किती असते मज्जा ….
फक्त एकदा मनापासून ., विचार कर माझा …!

नको करू काळजी ., असेन ना मी " सोबती " …!
दुःख हि नाही दरवळणार ., तुझ्या अवती-भवति …!
सुखाचेच क्षण असतील तुला मोजण्या …!
त्यासाठी एकदा तरी ., विचार कर माझा …!

माझ काय " हो " आहे , पण तुझाच निर्णय अंतिम असेल …
खरच सांगायचं तर …, आपलीच जोडी सुंदर दिसेल …!
काहीही ठरवलस तरीही , शेवटी मित्र असेनच तुझा …।
पण जर personally सांगतो ….,
एकदा तरी … विचार करून बघ माझा … !
एकदा तरी … विचार करून बघ माझा … !

अक्षय भळगट
१२.०६.२०१५

Wednesday 29 April 2015

त्यांचा पश्चाताप …

खरंच कुठेतरी चुकतो आपण …
जिवनात …, आपल्याच माणसांना मुकतो आपण …
नडतो आपलाच अहंकार आपल्याशीच …,
म्हणूनच तर ,
आपल्याच चुका भोगतो आपण !     (१)

समोरच्या शब्दाला शब्द वाढवतो आपण …
आपल्याच शब्दांवर पश्चाताप करतो आपण …
ठरत शहाणपण आपल …, माती खाल्याजोग …
म्हणूनच तर ,
आपल्याच हातांनी " शेण " खातो आपण !    (२)

पुढ नीट वागायचं …, हे हि ठरवतो आपण ….
नवीन रूढी , नवीन परंपरा अवलंबतो आपण …।
पण काही केल्या ., अंगातला " किडा " जात नाही ….
म्हणूनच तर ,
सरळ चालण्यासाठी जगाला वळण लावतो आपण … !

अक्षय भळगट
२९.०४.२०१५




Wednesday 15 April 2015

" मी-पण … !"

" मी-पण … !"

अवघड असत ., कुणाच्या इतक्या जवळ जाऊन ., परत तीच ताटा-तूट भोगन ….
मित्र - मैत्रिणी - त्यांचा सहवास - बोलण - हसण - रुसण - आपलेपणा .,
कुठेतरी मनाला ठेस लावून घेण्यापेक्षा ….
आधीपासूनच ठरवलं कि ., बास आता " नाही बोलायचं " ।
त्यामुळे एक वेळ अशी येईल कि …. तुम्हालाच एकटेपणाची सवय होऊन जाईल .

कोणी दूर जाताना होणाऱ्या यातना या आधीही भोगल्या आहेत .,
अजुनही मनाला लागलेल्या / पोळलेल्या जखमा, माझ्या "आठवणीं " सारख्याच
ताज्या आहेत .,

त्याला अजून त्रास नको म्हणून … संपर्क , सहवास कमी करावा लागतो .,
कारण प्रत्येक जण इतका मनाशी सलग्न आहे की
माझ्यातला " मी " कोण ??? हा प्रश्न नेहमी पडतो … !

या मित्रांमध्येच " मी " दडलेलो आहे , हे त्यांच्या सहवासातून कळाल मला !
पण तेच दुरावले तर माझ " मी पण .. !" हरवून बसेन कि काय ., याचीच भीती वाटते !
बस इतकच …. !



Friday 27 February 2015

मी शब्दात व्यक्त होत नाही !

तुला अस वाटत ., मी व्यक्त होत नाही ….!
पण कस सांगू तुला ., कधी कधी .,
मी शब्दात व्यक्त होत नाही !

एकदा नजर भिडव अशी , क्षणात तीही बोलू लागते .,
आवरलेल्या भावनेला मग माझ्या ., पळवाट ती शोधते .,
तरीही….  सांगावी तशी आपली , नजरच भिडत नाही ,
अन कस सांगू तुला ., प्रत्येकवेळी मी शब्दात व्यक्त होत नाही !

एकदा स्पर्श करून बघ , मग तुझ्या नसा ही थिरकावू लागतील .,
मला अचंभित केलेले प्रश्न कदाचित ., तुलाही पडतील,
तरीही … घट्ट मिठीत सुद्धा , आपले ऋणानुबंध जुळत नाही ,
अन आजही मी माझी भावना ., शब्दात व्यक्त करू शकत नाही !

सहजच नजर फिरवून बघ ., त्या कवितेत माझ्या .,
कदाचित भेटेल तुला प्रश्नाचे उत्तर ., तुझ्या ।
हरवशील तुही या विचारांत माझिया …. पण
ते आचरणात आणणार नाही .,
कारण तू हि तीच भावना शब्दात व्यक्त करू शकणार नाही
शब्दात व्यक्त करू शकणार नाही ….!


अक्षय भळगट
२७.०२.२०१५  

Sunday 1 February 2015

एक इच्छा .. मला तुझ बाळ व्हायचंय …!

एक इच्छा ..  मला तुझ बाळ व्हायचंय …!

हरवलोय ग स्वतःतूनच ., " मीच " ! माझा …
फक्त तुझ्या आठवणीतच रमतोय .,
पण आता ., जन्मोजन्मी तुज सोबतच रहायचय
अन .,  मला तुझ बाळ व्हायचंय …!

आठवत तुला .. मला तुझी खूप काळजी वाटायची .,
अन ., कुठेही जा पण तू ., माझा हात धरून चालायची .,
पण आज मला ., तुजसवे - तुझ बोट धरून चालायचय ..
 मला तुझ बाळ व्हायचंय …!

तुला माहीत आहे ., तू एक मैत्रीण - एक आठवण आहेस ..
थोडक्यात सांगायचं तर ., माझा जीव - माझ सर्वस्व आहेस ..
पण आता ., मला तुझा एक मित्र - एक सखा व्हायचंय .,
अन यासाठीच .,  मला तुझ बाळ व्हायचंय …!

आज ., न मी तुझा - न तू माझी !
सप्त पदींच्या फेऱ्यांसमोर ., प्रेमही फिक पडलंय !
पण तरीही ., मला तुझ्या श्वासात जगायचय .,
अन आज …  मला तुझ बाळ व्हायचंय …!
फक्त तुझ बाळ व्हायचंय …!

अक्षय भळगट
०१. ०२. २०१५



Tuesday 20 January 2015

कधी येशील तू ., सांग ना ??

तू कुक्कुल्ल बाळ माझं ., दिसशील कोणासारख ?
मन मिळाऊ असशील ., कि शांत पप्पा सारख ...
शब्द बोलण्याआधी एकदा ., " आई " म्हणशील ना …
कधी येशील तू  ., सांग ना ??

चाहूल तुझ्या येण्याने ., मनी फुललाय पिसारा .,
तुझ स्वागत करण्या ., मोहल्ला जमा झालाय सारा .,
कान अतुरलेत आमचे ., तुझे रडणे ऐकण्या .,
कधी येशील तू  ., सांग ना ??

उंच उंच आभाळी ., तुज झोका मी देईन .,
अलगद उचलुनी तुजला ., कवेत मी घेईन .,
आतुरलेत डोही माझे ., तुझे रूप भरण्या .,
कधी येशील तू  ., सांग ना ??

कसा सावरेल मी संसार ., अन कशी पेटवेल चूल ;
एकीकडे माझे सर्वस्व ., एकीकडे मुल .,
झालीच धावपळ थोडी ., पण तू समजून घे ना .,
कधी येशील तू  ., सांग ना ??


मनात घालमेल प्रश्नांची ., अन काळजी तुझ्या भविष्याची .,
अजूनही स्वप्नातच असल्या सारख ., ती जाणिव तुझ्या स्पर्शाची .,
या चारबाहू सज्ज आहेत ., कवेत तुला घेण्या  .,
कधी येशील तू  ., सांग ना ??

कधी येशील तू  ., सांग ना ??

अक्षय भळगट
२१.०१.२०१५











Saturday 17 January 2015

तू नसूनही , असल्या सारखी भासते ; काय हेच ते " प्रेम " असते .. ??

सोबती नसून आज सुद्धा , तू असल्यासारखी भासते ,
खरच सांग ना ग ., काय हेच ते " प्रेम " असते .. ??

खातानाही घास माझा हा ., ओठीच येउन थांबतो .,
समोर जशी तू उपाशी तशी ., मग मी जेवणच टाळतो .,
तुझ्या आठवणीतच माझे ., भरगच्च पोट भरते .,
खरच सांग ना ग वेडे  ., काय हेच ते " प्रेम " असते .. ??

उन्हातून चालते वेळीही ., स्पर्शावतो गार वारा .,
चहू-कडल्या गर्दी मधेही , शोधू लागतो तुझा चेहरा .,
मग त्या प्रत्येक चेहऱ्यामध्ये ., तूच  " तू " दिसते .,
खरच सांग ना ग ., काय हेच ते " प्रेम " असते .. ??

आपल्या जवळच्या नात्यांमध्ये ., वाढत असतो दुरावा .,
पण तू सोबत असता ., श्वास घेत असे मी मोकळा .,
सर्व दुरावले देखील तेव्हा ., तूच जवळची असते .,
अस का होत ., कोणास ठाऊक ., हेच ते " प्रेम " असते .. ??

खरच सांग ना ग वेडे., काय हेच ते " प्रेम " असते .. ??

अक्षय भळगट
१७. ०१. २०१५

Sunday 11 January 2015

माझ्या मैत्रिणीच ., मला काहीच कळत नाही ..

बोलावेसे वाटते खूप आणि काहीच बोलत नाही ..
माझ्या मैत्रिणीच ., मला काहीच कळत नाही .. !

हसते खूप गोड ., अन दिसतेही छान  …,
पण स्वभाव बदलते लगेच ., वाटत ., आहे अजून लहान !

प्रत्येक प्रश्नाला आता माझ्या .. तिची नकारार्थी मान डुलते .,
chocolate  समोर दिसता ., तिच्या गालावरची खळी खुलते …,

पण गप्पा गोष्टी करण्या ., राहिले मैत्रीचे दिवस चार .,
कारण लग्न होऊन तीच ., ती लांब जाणार आहे फार .,

आज आहे ती शांत ., याच कारणच समजत नाही …
दुरावा दोघांचा मला समजतो ., तिला काहीच उमजत नाही .,

बोलावेसे वाटते खूप आणि काहीच बोलत नाही ..
अन ., माझ्या मैत्रिणीच ., मला काहीच कळत नाही .. !

अक्षय भळगट
११. ०१. २०१५

Tuesday 6 January 2015

रंगवून रात गेली

गाण्याच्या ओळी :-
उसवून श्वास माझा , फसवून रात गेली ….
मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली ….

च्या पुढे …. MY  One

ओठांवरी स्पर्श तिचा , भासवून रात गेली ….
पहिले स्वप्न मी अन , रंगवून रात गेली ….