Sunday 22 January 2017

शब्द - शब्द,  फुल - फुल,

कधी उमगतात
कधी उमलतात
कुठे बहरतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल,  ।। १ ।।

कधी हिरवे
कधी गुलाबी
फिके पडतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल, ।। २ ।।

कधी सुगंध
कधी ऋतू
कसे दरवळतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल,  ।। ३ ।।

कधी मैत्रीण
कधी प्रियसी
आपलेसे होतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल,  ।। ४ ।।

कधी सुंदर
कधी गचाळ
कसे जन्मतात ... 
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल,  ।। ५ ।।

कधी ऊन
कधी वारा
ओलेचिंब होतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल,  ।। ६ ।।

कधी गोड
कधी कडू
तिखट बनतात ...
कळत नाही !
शब्द - शब्द,  फुल - फुल, ।। ७ ।।


अक्षय भळगट 
२३.०१.२०१७