Friday 27 February 2015

मी शब्दात व्यक्त होत नाही !

तुला अस वाटत ., मी व्यक्त होत नाही ….!
पण कस सांगू तुला ., कधी कधी .,
मी शब्दात व्यक्त होत नाही !

एकदा नजर भिडव अशी , क्षणात तीही बोलू लागते .,
आवरलेल्या भावनेला मग माझ्या ., पळवाट ती शोधते .,
तरीही….  सांगावी तशी आपली , नजरच भिडत नाही ,
अन कस सांगू तुला ., प्रत्येकवेळी मी शब्दात व्यक्त होत नाही !

एकदा स्पर्श करून बघ , मग तुझ्या नसा ही थिरकावू लागतील .,
मला अचंभित केलेले प्रश्न कदाचित ., तुलाही पडतील,
तरीही … घट्ट मिठीत सुद्धा , आपले ऋणानुबंध जुळत नाही ,
अन आजही मी माझी भावना ., शब्दात व्यक्त करू शकत नाही !

सहजच नजर फिरवून बघ ., त्या कवितेत माझ्या .,
कदाचित भेटेल तुला प्रश्नाचे उत्तर ., तुझ्या ।
हरवशील तुही या विचारांत माझिया …. पण
ते आचरणात आणणार नाही .,
कारण तू हि तीच भावना शब्दात व्यक्त करू शकणार नाही
शब्दात व्यक्त करू शकणार नाही ….!


अक्षय भळगट
२७.०२.२०१५  

Sunday 1 February 2015

एक इच्छा .. मला तुझ बाळ व्हायचंय …!

एक इच्छा ..  मला तुझ बाळ व्हायचंय …!

हरवलोय ग स्वतःतूनच ., " मीच " ! माझा …
फक्त तुझ्या आठवणीतच रमतोय .,
पण आता ., जन्मोजन्मी तुज सोबतच रहायचय
अन .,  मला तुझ बाळ व्हायचंय …!

आठवत तुला .. मला तुझी खूप काळजी वाटायची .,
अन ., कुठेही जा पण तू ., माझा हात धरून चालायची .,
पण आज मला ., तुजसवे - तुझ बोट धरून चालायचय ..
 मला तुझ बाळ व्हायचंय …!

तुला माहीत आहे ., तू एक मैत्रीण - एक आठवण आहेस ..
थोडक्यात सांगायचं तर ., माझा जीव - माझ सर्वस्व आहेस ..
पण आता ., मला तुझा एक मित्र - एक सखा व्हायचंय .,
अन यासाठीच .,  मला तुझ बाळ व्हायचंय …!

आज ., न मी तुझा - न तू माझी !
सप्त पदींच्या फेऱ्यांसमोर ., प्रेमही फिक पडलंय !
पण तरीही ., मला तुझ्या श्वासात जगायचय .,
अन आज …  मला तुझ बाळ व्हायचंय …!
फक्त तुझ बाळ व्हायचंय …!

अक्षय भळगट
०१. ०२. २०१५