Tuesday 14 October 2014

मन तुलाच शोधूनी पाहे !

मन तुलाच शोधूनी पाहे !

तुज ठाऊक आहे , हे शब्द आजही … तुझ्याच अवधी आहे .,
आज भिरभिरणारी नजर हि , मन तुलाच शोधूनी पाहे !

१)
नकळत जुळले ऋणानुबंध हे , नकळत जुळली नाती .,
भेद जरी असले मनी , तरी हा हात तुझ्याच हाती .,

खरच का ग इतके अवघड असते , आठवणीत गुणगुणणे .,
पावसाचे ते फक्त भिजून आपले , तुझ्यातच मी रमने .,

एकट चालताना देखील हि , तू असल्याचा भास होतो .,
नाहीच जरी तू जवळी माझ्या , तरी तिथे तुलाच मी शोधतो .,

रडताना हि ते ओलसर डोळे , आठवण तुझीच देतात .,
थांबते तितक्यात डोळ्यातील पाणी , मज साठवण मनात रुजतात .,

ओघळणाऱ्या गालांवरती , हात तुझाच स्पर्शावतो .,
मनातल्या यातना गुंफण्या , मी आठवण तुझीच काढतो .,

नाही जरी तू माझी " मी " तरी , मी तुझाच " तू " आहे  .,
गेलीस सोडून दूर देखील हि , मन तुलाच शोधूनी पाहे !

२)

ऐकण्या तुज मी अतुरलेलो , तुझे भाव ओंजाळून घेतो .,
इतक्यात येणारी हक तुझीही ., मी स्वतास विसरून जातो .,

अलगद उमलत पावले मातीवर , ती हि मी साठवली .,
गेली वाहून भरतीने  मातीही ., खोऱ्याने सागरातून काढली .,

तूच " तू " आहेस कवितेत माझ्या ; तूच तू राहशील सर्वदा ,
तुझ्याच तू ला प्रश्न असा कि , खरच आजही आहे का " मी " तुझा ??

शब्दांच्या या खेळ मध्ये ., बघ किती जीव तळमळत आहे ,
गेलीस सोडून दूर देखील हि , मन तुलाच शोधूनी पाहे !


अक्षय भळगट 
०९.०६.२०१४ 

Saturday 11 October 2014

आपकी यादो में...

आपकी यादो में खुदको सवांरना, अच्छा लगता हैं । 

१. हँसा तो सब देते हे , वो लोग ……  
    आपकी आंखो से वो , गम के आंसू पिना अच्छा लगता है … 
    आपकी यादो में खुदको सवांरना, अच्छा लगता हैं । 

२. भुल जाते है " राही " , अपनी राह चलते चलते … 
    आपकी बातो मे , वो खुदको भुलाना … अच्छा लगता है …. 
    आपकी यादो में खुदको सवांरना, अच्छा लगता हैं । 

३. छूट जाते है , हाथ भी .. अपनो के , अपनो से …. 
    आपके इस दर्द में , हाथ थाम लेना अच्छा  लगता है …. 
    आपकी यादो में खुदको सवांरना, अच्छा लगता हैं । 

४. बहाणो - बिन-बहाणो से , खामोश रहना …। 
    आपकी हर बात को , खामोशी से दोहरना अच्छा लगता है …. 
    आपकी यादो में खुदको सवांरना, अच्छा लगता हैं । 

५. समझ - ना-समझ तो , अपनी नाराजगी कि बाते है … 
    उस बात मे भी …, आपको समझना अच्छा लगता है …. 
    आपकी यादो में खुदको सवांरना, अच्छा लगता हैं । 

६. मिल जाते ही हमदर्द भी ., इन मंदिर - मज्जिद्दो मे …,
    तुझमे मेरा खुदा , मेरा दीदार देखना … अच्छा लगता है … 
    आपकी यादो में खुदको सवांरना, अच्छा लगता हैं । 

    आपकी यादो में खुदको सवांरना, अच्छा लगता हैं ।  


अक्षय भळगट 

Saturday 4 October 2014

एक चुक

माझे शब्द कधीच कळले नाही तुला , पण …. 
तुझी काळजी 
तुझी स्वप्न 
तुझी इच्छा 
तुझ्या आकांशा 

हि माझी असल्यासारख  वाटत, कारण …. 
मला कुठेतरी चुकल्या सारख वाटत …. 

कदाचित तुला जाणवणार नाही , पण …. 
माझ हसन 
माझ रुसन 
माझा आनंद 
माझ बोलन 

हे कुठेतरी हरवल्या सारख वाटत, कारण…. 
मला कुठेतरी चुकल्या सारख वाटत …. 

मनातली स्पंदने जाणण्याची, आता तुला गरज नाही ; पण …. 
एक माझ्यातली "तु " , 
एक तुझ्यातला "मी" 
एक मैत्रीण
एक आठवण 

अस कुठेतरी संपल्यासारख वाटत, कारण  .…. 
मला कुठेतरी चुकल्या सारख वाटत …. 

शेवटी आजही , 
ती तुला शोधणारी नजर 
अलगद अंगावर येणारी पावसाची सर 
आपल्या आयुष्यातल्या गमती - जमाती 
कळत - नकळत जुळलेली हळुवार  नाती 

आता कुठेतरी तुटल्यासारख वाटत, कारण … 
कारण फक्त एकच …. 

मला कुठेतरी चुकल्या सारख वाटत …. !

---
अक्षय भळगट 
२७.०३.२०१४

   

Wednesday 1 October 2014

किती सोप्प असत … कोणाला टाळण …. !

किती सोप्प असत , कोणाला टाळण ।

कितीही सांगितलं या मनाला तरीही ., ऐकत नाही ,

आज परत एक गैर समज दूर झाला ………….

"एक"-मेकांना समजून घेताना , कधीच वाटल नाही कि ,
शेवटी तो "एक" मीच आहे … जो समजून घेतो…

वाटायचं कि , आपल्याला कोणीतरी ऐकेल , अस मिळालं ।
समजून घेईन ,
चुकत असेल तर सांगेन ,

पण हसायला येत असत , स्वतःवरच … आणि नंतर , सगळ झाल्यावर ….

किती सोप्प असत , कोणाला टाळण । १)

मन मानत नाहीये …, कि अजूनही "ती" जातीये …
एका अशा ठिकाणी कि , परत कधीच , चुकूनही या वाटेकडे बघताना ….
तिला " हि वाट" मोकळी नजर असावी , अस वाटेल … !

आणि एक वेळ अशी हि होती कि ,
एकट रस्त्याने चालताना सुद्धा , तिला …
मी सोबत असल्यासारख वाटायचं … खरंच ….!

किती सोप्प असत , कोणाला टाळण । २)

आजही बोलताना वाटत तिला सांगाव,
कि …. चांगल आहे विसरलीस ते  ;

कि परत त्याच  FEELINGS  , ज्या आधीही
या समाजाकडून मिळत राहिल्या , त्या तुझ्यामुळे सतत या जिवाला
हेच आठवण करून देतात कि , खरंच …. !

किती सोप्प असत , कोणाला टाळण । ३)

पण एक वेळ अशीही येईल कि ,
तुला हेच वाटावे …,

खरच ; आज मी असतो अजुनहि ,

तर तुला समजावू शकलो असतो ,
ऐकू शकलो असतो ,

पण , …. पण "ती वेळ" शेवटची असेल ।

कारण , या शरीरातून , या मनातून ….
तेच भाव … तुझ्या पर्यंत पोहोचायला , त्या FEELINGS ,
त्या भावना , माझ्यात  उरल्या नसतील … ! 

आणि त्या वेळी , तुही हेच म्हणशील कि…. 

" अक्षय "   खरंच …,

किती सोप्प असत , कोणाला टाळण । ४)


अक्षय भळगट
१८.०३. २०१४

खंत .... !

खंत ….

आयुष्यात खंत एवढीच की ,  मी पुढे लढू नाही शकलो ,
सौंदर्याच्या मूर्तीला मी त्या , या हातांनी घडवू नाही शकलो ,…।

अथक परिश्रम घेतले तरीही , एक रूप । एक जीव … बनवू नाही शकलो ,
ओबड धोबड आकृतीत मी त्या , एक चित्र रंगवू नाही शकलो …. ।

खर तर दगडात मूर्ती असते , त्या मूर्ती मध्ये दगड पाहू  नाही शकलो ,
तिला स्वत: लाच घडायचं नव्हत , हे मी ! जाणवू नाही शकलो …।

खापर तिच्या अंगावरचे ते …, दूर मी करू नाही शकलो .,
इतक्या वेदना होऊनही तीस , मी अंगावर त्या घेऊ नाही शकलो … !

अर्ध भरलेल्या त्या तृप्ती च्या घाग् रीस , मैत्रीच्या मायेने भरू नाही शकलो … !
मूर्तीतून ओघळणा-या अश्रूंना मी ., या ओंजळीत साठवू नाही शकलो …

कवितांच्या छन्नीने माझ्या …, तिच्या गालावर हसू उमटवू नाही शकलो ,
आठवणींच्या सागराने मी त्या , वेडूची तहान भागवू नाही शकलो …

तरीही धीर नाही सोडला …  पण मी प्रयत्न करू नाही शकलो …।
न राहवून सुद्धा मी "तीच " … मन वासनेतून वळवू नाही शकलो …

आयुष्यात खंत एवढीच की ,  मी पुढे लढू नाही शकलो ,
सौंदर्याच्या मूर्तीला मी त्या , या हातांनी घडवू नाही शकलो ,…।

Tuesday 30 September 2014

आठवण ...

खूप काही सामावलंय मी माझ्यात ,
त्याचाच गुंतडा सोडवत आहे,
आज मी माझ्या आठवणींना,
मागे वळूनी पाहत आहे…. !